Features

All features available.

Single Graph

ग्राफ हे आमचे पारमपारिक शास्त्राधारितचे संशोधनाचे आणि माझ्या ५२ वर्षांच्या मेहेनातीचे अभ्यासात्मक सुधारितस्वरूप आहे. दीड दोन हजारवर्षां पूर्वीच्या काळात हयात असलेल्या उच्यतम व्यक्तिमत्वाच्या सहज प्रभावाने सचेतातील जीवन प्रवाहाचे आध्यात्म ज्ञानाधारित विचारात समाविष्ट केलेल्या सामुहिक तत्वप्रणाली मुळे त्यांच्या ज्योतिष शास्त्राचा विकास झाला. आमच्याकडे याचा तंतोतंत समावेश असून त्या शिवाय आमचे ग्राफचे निर्णय विज्ञान छाननी नुसार ९०% अचूक आणि उपयुक्त ठरत असतात. हा विज्ञान संशोधनाने सीध्द केलेला भाग आहे.

   ग्राफ हा १२ महिन्याचा असून कोणत्या तरी आपण दिलेल्या (४३ पैकीच्या) एक विषयाचा असतो, त्यातील कालावधीसह दिलेली लाल रंगाची मुदत आशुभ असून हिरव्या रंगाची मुदत शुभ असते. त्याची मुदत १, ९, १६, २२ आणि महिना अखेर अशा तारखा सहित असते. नियम:- शुभत्वात केलेल्या/घडलेल्या त्या विषयाचे निर्णय/फल लाभदायक तर असतेच अर्थात नुकसान कारक नसते. या उलट अशुभाचे समजावे. कोणत्याही घडलेल्या/केलेल्या कृतीचे फल याच पद्धतीचे असते त्यामुळे ते काम केव्हा करावे हेतरी अचूक कळते, जेणेकरून त्याचे हाताळण्याचे नियं-त्रण आपल्या हाती आणता येते. हे एक मोठे संशोधन आहे आणि ही काही कॉम्प्युटरची अगर गणिताची विस्मय कारक कला कृती नाही. 

DUAL GRAPH (GRAPH COMBINATION)

केवळ एक ग्राफ वरून अचूक निर्णय स्वीकारू नयेत म्हणून भरीव स्वरुपात निश्चयात्मक फल लाभावे म्हणून जोड ग्राफची व्यवस्था केलेली असते. याची ११२८ जोड्यांची माहिती Letter03 मध्ये सविस्तर दिली आहे. दिसायला हा प्रयोग मुहुर्ता सारखा कमकुवत जाणवला तरी letter10 प्रमाणे कोणतेही किचकट प्रश्न अचूक, उपयुक्त आणि चटकन कसे सोडवले जातात हे तुम्हाला समजेल. येवढ्या मोठ्या प्रमाणावर या पद्धतीत सखोल जाऊन अचूक मार्गदर्शन करता येते. तुम्हाला ज्या विषया संबंधित काम करावयाचे असते तो पहिला विषय असतो आणि त्या विषयाचे काम का आणि कशासाठी करावयाचे याच्यासाठी दुसर्या विषयाचा नंबर असतो. उदा. नं. ३१ चा व्यवसाय काशासाठी करायचा तर दुसरा नं. ३६ च्या पैशाची मिळकत कमवण्या साठी, आशा नंबर वार जोड्या असतात आणि त्यादोन्ही विषयाचे सुख व लाभ मिळवण्या साठी समान ग्राफच्या शुभ कालावधीचा वापर करावयाचा आसतो, ज्यामुळे दोन्हीचे सुख मिळते. संशोधनाच्या निर्णयानुसार हे फल ९०% अचूक असते.

MARRIAGE PERIODS

या तारखा काढण्यासाठी नं. २१ कौटूंबिक सौख्य आणि ४ विवाह/वंशवृद्धी या दोघा वधू वरांच्या चार विषयाचे एकत्रीकरण करून, विज्ञान सिध्द विवाह योग्य तारीखा काढता येतात. या तारखेस विवाह केल्यास त्यांचा घटस्फोट, ताटातूट सारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही हे रिसर्च करून सिध्द केले आहे. पुरातन ३००० वर्षापूर्वीच्या ज्योतिष इतिहासा नुसार ज्योतिष शास्त्राचे भाकीत हे जन्म लग्न कुंडली नुसारच होते. त्यामुळे या जन्म पत्रिकेच्या पद्धतीला सोडून असलेल्या विवाह मुहूर्त या प्रचलित पद्धतीचा आधार आम्ही घेत नाही. केवळ त्या वधूवरांच्या जन्म कुंडली आधाराने विवाह, कौटूंबिक, वंश वृद्धीचा विचार विज्ञाननिष्ठ ग्राफच्या सहायाने काढून त्यात असलेल्या शुभत्वात विवाह करण्याचे सुचवत असतो. जन्म तारीख आणि पत्रीका याचा आधार नसलेल्या विवाह योग या प्रचलित पद्धतीचा आम्ही स्वीकार करीत नाही. अनुभवानुसार जोडप्याला कोणत्याही मोठ्या अडचणी न येता कौटुंबिक सुख लाभते हा आमच्या विज्ञान संशोधनाचा निर्णय आहे. तरी पण ग्राफिकच्या विवाहाच्या तारखा सोबत प्रचलित विवाह मुहूर्तात असतील तर विवाह करण्याचे सुचवत असतो.

CONCEPTION

आमच्या जीवन मागदर्शन पद्धतीत जीवनाचे भविष्य वर्तवणे हा विचार त्याज्य आहे. कारण प्राचीन काळात असलेली सर्वच शास्त्रे, ग्रंथ, वर दिल्या प्रमाणे आध्यात्मिक तत्वप्रणालीला धरून असल्याने या समाजाच्या हिताचा विचार करून ऋषीमुनींनी लिहिली होती. त्यात भविष्य सांगणे हा बाहेरून विचार त्यात घेतला असावा असा आमचा समाज आहे. सामाजिक गरज आणि आवड या नात्याने त्यास दाद देणे चुकीचे होणार नाही म्हणून साशोधनात थोडाफार शास्त्राला धरून आम्ही प्रयत्न केला आहे एवढेच. नियम : गर्भ धारणा आणि जन्म तारीख वेळ (या दोन्हीही जिवाच्या जन्म तारखाच असतात) त्या जर एखाद्या ग्राफच्या विषयात अशुभ असेल तर (काळजी घेण्यासाठी) त्या विषयाचे त्या व्यक्तीला सुख अडचणीचे / कटकटीचे मिळताना आम्हाला आढळले आहे. परंतु गर्भ धारणा तारीख ही सर्वांचीच ९ महिने ९ दिवसाशी बांधील नसते. या कमी अधिकतेच्या  उणीवेमुळे याचे प्राप्त झालेले निर्णय ९० % ऐवजी आम्हाला ६० % अचूक आढळले आहेत. ते आपण ६० % च धरावेत. विषय नं. ६= वक्तृत्व, नं. १९= तब्बेत, नं. २१= कौटूंबिक, नं. ३१= व्यवसाय, नं. ३६= आर्थिक, नं. ४१= धनहानी न होणे या सहा विषयाचे त्या व्यक्तीsaatच्या आयुष्यभरा साठी इष्टानिष्टत्व दर्शविले जाते. त्यावरून त्या व्यक्तीने त्या विषयासाठी नित्याने कोणती दखल घ्यावी हा मोलाचा सल्ला आयुष्यभर उपयोगी पडतो.   

KUNDLI

हे काही आमचे संशोधन नाही पण पारमपारीक पद्धतीला अनुसरून आम्ही देत असतो. याचा वापार १२ भाव, १२ राशी, ९ ग्रह, २७ नक्षत्रे, ३६० औश याचे गुणोत्तर धरुन त्याच्या फलीत वाक्यांची सख्या १ कोटी २६ लाख फालीत संग्रह होतो. तो तोंडपाठ असणारा माणूस जगात एकही नसणार. स्मरणच नसेल तर कोणीही कितीही प्रयत्न केला तरी भाकिताच्या अचूकते पर्यंत पोहोचण्यासाठी तेथे मानवी बुद्धी अपुरीच पडणार आहे. साधारण २४ तासात जन्मणार्या २२८००० बालकात एका लग्नाची बालके १९००० असतात. २४ तासात ग्रह हे काही विकला अगर कला मागे पुढे सरकत असतात. त्यामुळे या १९००० बालकांच्या पत्रिका जुळ्याप्रमाने एकसारख्याच असतात. या कारणाने जन्म पत्रिकेवरून भाकीत करणे अडचणीचेच ठरते. कारण या सर्वांच्या घटना क्रम आणि तारखा कधीच एकसारख्या असत नाहीत. मात्र या सगळ्यांच्या जीवनातील घटना क्रम भिन्नच असणार. म्हणून जीवनातील घडणार्या घटनांच्या तारखेस असलेल्या गोचरी ग्रहमानाचा इष्टानिष्ट भाग जो ग्राफमध्ये येतो त्यावरून आम्ही मार्गदर्शन करतो. ते विज्ञान छाननीने ९० % अचूक असते हे आम्ही सिध्द केले आहे. 

MATCHMAKNIG

हेही आमचे संशोधन नाही. पुरातन ३००० वर्षापूर्वीच्या ज्योतिष इतिहासा नुसार ज्योतिष शास्त्राचे विवाह सुखाचे भाकीत हे जन्म लग्न कुंडली आधारितच असावयास हवे आहे. त्यामुळे या जन्म पत्रिकेच्या पद्धतीला सोडून असलेल्या विवाह जुळवण्याच्या पद्धतीचा आधार आम्ही जमेस घेत नाही. त्या कारणासाठी आम्ही गुणमेलनापेक्षा जन्म पत्रिका अधारीतच्या ग्रह मेलनाला काहीशा जुन्या काळातील पद्धतीला प्राधान्य दिले आहे. तरी पण प्रचलित पद्धती म्हणून गुणमेलन माहिती साठी दर्शवीत असतो. ग्रहमेलन आणि गुणमेलन या दोन्हीचा कौशल्याने उपयोग करून घेण्याची ही अभिनव पद्धत आम्ही सुचवली आहे.